THANKS TO TEACHAR 1.png 
छत्रपती संभाजीनगर

राज्यभरात शिक्षक दिनी सोशल मिडियावर 'थॅंक्स अ टिचर' अभियान 

संदीप लांडगे

औरंगाबाद : पाच (ता.०५) सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षक हा महत्त्वाचा दुवा असतो. शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस यंदा "थँक्स अ टीचर" अभियान राबवून साजरा करावा,  असा शासन निर्णय जाहिर करण्यात आला आहे. 

भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर "शिक्षक दिन" साजरा करण्यात येतो. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, रविंद्रनाथ टागोर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. त्यामुळे शिक्षक दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनामुळे शिक्षक दिन नेहमीप्रमाणे साजरा करता येणार नाही. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन कौशल्य, नवीन शैक्षणिक साधने वापरत आहे. केवळ शाळेमध्ये जाऊन शिकवणे, या पलीकडे जाऊन आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षक मुलांना शिक्षण देत आहेत. ज्या ठिकाणी अशा आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी काही शिक्षक स्वतः पुढाकार घेऊन मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शिक्षण/ ज्ञानदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. असे हे शिक्षक अभिनंदनास पात्र आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे अमुलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली, ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी ही मोहीम सोशल मीडियाद्वारे देखील राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.

यामध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग असणार आहे. इन्स्टाग्रामवर @thankuteacher१ , ट्विटरवर @thxteacher१ आणि फेसबुक हॅण्डलवर thxteacher यावरही अभियान राबविण्यात यावे. याबरोबरच १० सप्टेंबर पर्यंत मी कोविड योद्धा, शाळा बंद शिक्षण सुरु, वक्तृत्व , निबंध आणि चित्रकला स्पर्धा, पोस्टर, घोषवाक्य, कविता, प्ररेणा आणि प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन आदी अभिनव स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात यावी असेही शासन निर्णयात म्हटले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT